...

1 views

🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩
जिजाऊ पोटी जन्मला सिंह ,
स्वराज्यासाठी झिजवला ज्यांनी देह ,
शिवाई देवीच्या ज्यांचा डोक्यावर हात ,
असे महाराष्ट्चे आरध्य दैवत ,
छत्रपती शिवाजी महाराज 🚩

शस्त्र विद्येत, शास्त्रात पारंगत
आदर्श राज्यकर्त्या सारखे तरबेज ,
सिंहासनाचे अधिश्वर
असे आपले राजे...

शंकरासंम रौद्र रूप ,
बीज रोपिले संस्काराचे ,
काळजाला बांधली गाठ ,
विझविली मुघलांची आग ,

माता ज्यांची जिजाऊ ,
पिता ज्यांचे शहाजी ,
जे लढले जन्मभरती,
असे आपले शिवछत्रपती ..

छ्त्तीस हत्तीचे बळ होते ,
राज्याचे हितचिंतक होते ,
महाराष्ट्राची आन ,बान ,शान
जनतेचे राजे शिवछत्रपती होते

ना नियम ,ना कलम
तरीही प्रजा सुखाने नांदत होती ,
केला ज्यांनी गनिमी कावा ,
चढविला मोगलांवर हल्ला ,

रयतेसाठी लढले ,
धर्मरक्षणासाठी प्राण पणाला लावले ,
ईतीहासाच्या सोनेरी पानावर
आपले नाव अजरामर करून गेले
असे आपले शिवाजी राजे 🚩🚩