...

3 views

संपले ते आयुष्याचे, वेगळेच पर्व होते...
बैचेन मी आता, झालोय घोकल्याने...

अस्वस्थ मी आता, मनातले ओकल्याने...



योग्य कि अयोग्य, याची तमा न होती...

प्रतिमा मनात माझ्या, फक्त तुझीच होती...



तू बोलली ना काही, त्याची अपेक्षाच होती...

अबोल राहशील तू, याची अपेक्षाच नव्हती...



संपले ते आयुष्याचे, वेगळेच पर्व होते...

दाटल्या मणी धुक्याचे, वेगळेच बंध होते...



हि हार माझी मला कबुल आहे...

तुझ्या मनात माझी किंमत शून्य आहे...



ही रात्र सरेल आता, पुन्हा पहाट होईल...

जे स्वप्न ठिणगीचे, आगीचे लोट होईल...



हलकेच आवडीची जागा मनात घेईल...

सये तुझ्याच ओठी माझीच हाक होईल...
© SURYAKANT_R.J.