...

2 views

मंगल आशिष..!
*श्रावणमास विशेष...९*

*रोज एक ‌श्रावण कविता...*

*काव्यप्रकार... अष्टाक्षरी कविता*

९) *'मंगल आशिष '*

आला श्रावण महिना
झुला झुलतो मनात
ओढ लागे माहेराची
क्षण मावेना क्षणात...!

सणवार सव्यसाची
हळवेली कुजबुज
हुरहुर उत्साहात
माय लेकी हितगुज. !

ऊन्ह पावसाचा खेळ
अशा श्रावण मायेत
येई गोविंदा नाचत
रमे श्रावण छायेत. . . !

वसुंधरा पालवते
दावी सृजनाचे रंग
श्रावणात संकीर्तनी
नरनारी होती दंग... !

सातवार सात सण
आहे श्रावणाचे सार
ब्रम्हा ,विष्णू , महादेव
अध्यात्मिक मूलाधार. . !

स्थिती उत्पत्ती लयाचे
तीन्ही देव सर्वाधीश
श्रावणात वाणवसा
जणू मंगल आशिष. .. !

*विजय यशवंत सातपुते, पुणे*
© All Rights Reserved