...

1 views

शिवरायांचा छावा
शंभूराजांची, संभाजी महाराजांची कीर्ती,
बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम,
दरबारी पुसतो औरंगजेब
भल्या भल्यांना फुटला घाम,
याला कोण घालिल येसन
दरबारी पुसतो औरंगजेब,
औरंगजेब म्हणजेच मुघलांचा बादशहा बर का!

नजरेत त्याच्या अंगार,
दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार,
साऱ्यांनीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला
हम लायेंगे संभाजी को,
अन त्याने विडा उचलला
नाव त्याच मुकर्बखान …२
जिता जागता जणू शैतान
खान बोलला छाती ठोकून,
संभाजीला टाकतो ठोकून
मरहबा, सुभानअल्लाह
कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित
त्याच घोडदल पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी शेतानाच बळ,
पाहणारा कापे चळचळ
वाटेत भेटेल त्याला चिरडीत,
ठेचीत खानाची सेना निघाली
वतनाच्या आशेने गणोजी शिर्के फितूर झाले,
त्यांनी राजांची अनेक माणसे फितूर केली,

गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
पण कसा तरी धडाडला , ,
संगमेश्र्वरी राजांवर खानान
बेसावध असताना हल्ला केला,
राजांची सेना मूठभर..
कसा लागेल निभाव
संगमेश्र्वरी युद्ध जाहले
रक्त सांडले पाप..

अखेर मराठेशाहीचा छत्रपती
शिवरायांचा छावा,
खाननं कैद केला,
आणि ठरल्या प्रमाणे
राजांना बहादूरगडात ठेवले...

असा शिवाजीराजांचा तो छावा..
गनीमानी कसा वेढीला..
औरंगजेबासमोर नेले राजाला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
औरंगजेब बादशहा बसला होता एका अंगाला..

मुकरबकखान त्याच्या संगतीला
शंभूराजांच्या संगती कवी कलश ठेविला
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ संभा आओ बादशहाको तशरीफ करो
राजे म्हणाले औरंगजेब उलट तूच आम्हाला मुजरा कर..कारण मराठ्यांचे छत्रपती तुझ्या दरबारात आहेत...
राजे हाक मारीत होते हसरी …२
रोखून नजर गगनी
पाहून संभाजी राजाला ,
औरंगजेब बादशहा भिऊन थरारला,
राजाच पहात तेजस्विनी अंग..
तख्त त्यागतो औरंग
लहूने माखत तरंग...
राजा जून शोभे महाबली बजरंग..

औरंगजेबान राजासमोर प्रस्ताव मांडला
अन हिंदू धर्म छोडो, मुसलमान बनो, वरणा मौत कबूल करो...
राजांनी प्रस्ताव उधळला..
आणि म्हणाले संभाजी हजार बार मरेगा लेकीन हिंदू धर्म नही छोडेगा....
शोभला छावा शिवछत्रपतींचा....

अन् बादशहानं दगा केला
राजाला मरण यातना दिल्या …२
रख रखं छेडलं अंगाला …
राजांच्या मुखातून वेदनांचा स्वर
किंचितही न निघाला..
बादशहा गडबडला...

इतक्यात महाराजानी
जोर जोरात हसण्याचा आवाज केला..
बादशहानी चाबुकाचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
राजा रक्ताने माखला...
पण न शरण गेला बादशहाला...
असा शिवछत्रपतींचा तो छावा शोभला...

तिथं रायगडी दरबार भरला
पानी आल येसुरानीच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
असला बेहुद कठीण वकुत आला
मराठ्याचा राजा दुश्मनाच्या गोटामधी आडकला

औरंगजेबाने रायगडवर एक वकील पाठवला
अन् सांगावा धाडला स्वराज्यातील साडे तीनशे गडकोट मुघलांना स्वाधीन करा. कारण मराठ्यांचे छत्रपती आमच्या कैदेत आहेत...

बादशहा भला मोठा
आला बेगुमान नाही त्याला जाण
महाराणी येसूबाई च्या करामतीची…..२
अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२
अन करील काय कल्पना युक्तिची
महारानी साहेबांनी निरोप घेतला …२
न दंडवत घातला भावानीला
राजाराम राजांचा राज्याभिषेक केला..
छत्रपती बनवले राजारामला..
दूर दृष्टीचा विचार केला..
म्हणूनच म्हणतात ना
येसु रानी ती शंभूची,
सून ती शिवाजीराजांची,
शोभे सावली जिजाऊची...
अशी होती ती वाघीण...
केला त्याग स्वराज्याला..
केले छत्रपती राजारामला..
एकांतात राजमाता सकवारबाई महाराणी येसूबाईला
म्हणाल्या, स्वराज्यातील सर्व गड किल्ले, पैका ,खजाना त्या औरंग्यास द्या पण माझा पुत्र सोडवा तुमचं कुंकू वाचवा...
त्यावर राणीनं जवाब दिला..
नाही मातोश्री तस करता येणार नाही..
शरण हा स्वराज्याचा स्वभाव नाही.
शरण हा छत्रपतींचा गुण नाही.
तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळ औरंग्याला देऊन रयतेच्या कपाळावरच स्वतंत्र पुसायच आम्ही..
त्या पेक्षा आमचं कुंकू पुसल तर बर.....

अन् तिकडे संभाजी राजे मरण पावले...
पण होती ती राणी कणखर..
शोभे शंभूराजांची वाघीण.
बादशहानं रायगडाला वेडा दिला...
येसुराणीनं वेढिला..
पराक्रमाचा मोडा शत्रूंना दिला..
सुखरूप बाहेर काढले राजारामला..
दरबार जिंजीस हलवला..
नऊ महिने रायगड तिने लढविला..
युक्तीने रायगड मोघलांच्या स्वाधीन झाला..

अन् दुर्दैवाने महाराणी येसूबाई,त्यांचे पुत्र शाहू राजे ,महाराणी जानकीबाई व राजमाता सकवारबाई कैदेत सापडले.

पण राणी होती बुद्धिमान..
तिने रणनीती आखली..
बादशहाच्या छावणीत शिरली..
पण तिथं औरंग्याच्या छाताडावर
पाय रोहून 32वर्ष कैदेत राहली..
आणि स्वराज्य सुरक्षित ठेवलं..

- दर्शन बोंबटकार