बदलतोय भारत
बदलतोय भारत
खरंच भारतात बदल घडतोय
गुन्हेगार मोकाट फिरतोय
जनतेमध्ये स्फोट करणारा
आरोपी आजही तुरुंगात
व्ही.आय.पी.सेवा कसा काय उपभोगतोय
इतर सामान्य गुन्हेगार प्रमाणे
त्या आरोपींना सुध्दा शिक्षा द्यायला
तुरुंग अधिकारी कसा काय विसरतोय
खरंच भारतात बदल घडतोय
प्रामाणिक पोलीस अधिकारी सुद्धा
दहशतवाद्यांकडून मारला जातोय
त्याच्या 'ए.टी.एस.'तर्फे शोधलेले संशयित
गुन्हेगार 'एन. आय. ए.' ला अमान्य वाटतोय
'ए. टी.एस.' चा गुन्हेगार
'एन. आय. ए.'चा पुरावा सुध्दा
कसा काय खोटा ठरतोय
होय, भारतात बदल घडतोय
अवैध्य कामांना चाप लावणारा
भ्रष्टाचाराला रोखणारा जनतेच्या
सुधारणेसाठी प्रामाणिक पणे
काम करणारा अधिकारी...