...

6 views

😘❤ ॠणानुबंध ❤😘
ॠणानुबंधांचे ___ नाते
कधीच कळले ' ना ... ' ते ;
' कळावे लोभ असावा ! '
आताशे ... झाले पुराणे ।
सम्मोहनातले ___ स्नेह
पाण्यापरी __ ते ... पातळ ;
स्निग्धतेतही ___ जाणवे
वसाचिये ... अडथळ ।
घ्यावा कसा घास आता
गळा .. आर्त __ सुकलेला ;
पाचोळा पानांचा __ आत
काळजात ... कुजलेला ।
गर्भात ... वाढे __ अभ्रक
शोषून ... श्वास __' आईचे ' ;
पोसने ... नव्हे ___ तयास
' कर्म ' ते ... नित्य __घाईचे ।
वाटे ! जरी ... संपवावे
नाते ... ॠणानुबंधांचे ;
नाळ ... ' ती ' असते _ घट्ट
एकसुत्री ... संबंधाचे ।

✒️ कवी ,
... विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी