...

8 views

नावात काय असतं
नावात काय असतं? म्हटलं तर बरंच काही..
नावात आपलं अस्तित्वही लपलेलं असतं...

नाव आपलं असेलही छोटं वा मोठं,
पण बोलणं वा काम करू नये कधी खोटं...

दुसऱ्यांनी नावं ठेवून ते काळवंडत नसतं,
पण सत्कर्मांनी आईवडलांचही नाव उजळून निघतं...

नावाला जागणं आपापल्या हातात असतं,
आपल्या आयुष्याचं खरं मर्म आपणच जाणायचं असतं...

नावासोबत जोडलेलं असतं माणसाचं अनं देवाचही सर्वस्व,
कुणी काळीमा फासलाच जरी कर्मांचा, गैरसमजांचा अनं दुषणांचा..
त्यानंही राहतं अबाधीत व्यक्तिमत्व.. तिचं, त्याचं अनं देवाचं...

© Prasad Thale
---
#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#inspirational
#writco
#writcoapp