...

5 views

खरचं सोपं असतं का जीवन जगणं ?



खरचं सोपं असतं का जीवन जगणं ?
गुलाबाच्या फुलासोबत काट्यांनाही आपलसं करणं,
मन रडत असतानाही ओठांवर हास्याच ठिगळ लावण,
कधी हरलो जरी नशिबाशी लढताना तरिही एकदिवस जिंकण्याची आशा ठेवून
कांट्याकुट्यांची पायवाट चालणं...


खरचं सोपं असतं का जीवन जगणं ?
रोज तीळ तीळ मरून आयुष्याशी सांगड घालणं,
सर्वांची मने जपता जपता स्वतःच्या मनाला कुलूपबंद करणं...

खरचं सोपं असतं का जीवन जगणं ?
घाव झेलत आपल्यांचेच, त्यांच्या चांगल्यासाठी अहोरात्र झटणं ,
संकटांशी दोन हात करता करता
कधीतरी मनाच्या शांततेसाठी एकांतात दोन अश्रू गाळणं...

खरचं सोपं असतं का जीवन जगणं?
आयुष्याच्या रंगमंचावर जीवनपटलाची
उजळणी घेत एक दिवस शांतपणे निद्रिस्त होणं...

पण मग असा प्रश्न पडतो,
खरचं एवढं अवघड असत का बरं जीवन जगणं?

खरंच एवढं अवघड असतं का जीवन जगणं . ?
की अवघड करून घेतो आपणच आपलं जगणं . . . ?
जीवन थोडसं लाईट केलं तर .. जगणंथोडं डिलाईट केलं तर ...
आपल्यांसाठी रोज मरण्यातही थ्रील घेतलं तर
आली जरी संकटे तरी थोडंसं चिल घेतलं तर ...
जीवाला जीव देणारंही कोण असतंच ना आपल्यासाठी
आणि नसलेच कोणी तर आपणच असतो न आपल्यासाठी ...
जीवन नसतं फक्त नाहक प्रश्रांचं ओझं बाळगण्यासाठी
जीवन मिळतं फक्त एकदाच .....
हर एक क्षण अगदी मन भरून जगण्यासाठी..!

   


© बोलक्या भावना