...

1 views

प्रश्न पडती रोज नवे
कधी कधी आयुष्यात ओंजळीत प्रश्न पडतात ती ओंजळ घेऊन कोण ती दिशा शोधू
हे खरे का ते खोटे कोणती वाट धरुन चालू
का शेवटी खापर नशीबा वरती फोडू
चार तोंडे चार बोलतील रिती रिवाजाचे घरट् विनतील
खरे खोटे करायला कशाला हवी चार चौघांची पंचायत मी नाही का मांडू शकत माझे मत
खरे खोटे ठरवण्याचा कुणी दिला अधिकार
तोच अधिकार देतो आत्मविश्वासला चटका आणि स्वप्नना मार
कधी नको तेवढे खरे बोलून तर कधी खोटेपणाच्या ओलांडल्या सिमा आणि केली माणूसकी ठार

कवयित्री पल्लवीराणी