...

10 views

देवाचा धर्म
आपण कोण आहोत देवाला काही विचारायला?
का त्याच्या नावाने प्रस्थापीत धर्माला नावं ठेवायला...

आपण असूही त्या देवाचे भक्त,
ज्याची आराधनाही करते ह्या मनास सशक्त...

पण आपलं मन नसतं विरक्त..
देव दर्शनास जाताही पडती नकोते प्रश्न...

आपला अप्पलपोटीपणा नाही आपणच कमी करत..
अनं त्यानं देव नाही परका वा खोटा ठरत...

कुणा महात्म्याला अडवलं असेलही,
कुणा हीन विचारांच्या जातीभेद मानणाऱ्या पुजाऱ्यांनी...

पण त्यानंही जाहला माणसाच्या प्रगतीचा मार्ग,
अनं त्यानी केला उद्धाराच्या नव्या पर्वाचा शुभारंभ...

कुणाच्या अस्तित्वाला अनं धर्माला नावं ठेवू नये,
देव असतो त्याच्या जागी अढळ.. माणसाने देवाच्याच धर्मासाठी,
वा क्षुल्लक कारणांसाठी.. माणुसकी सोडून एकमेकांशी भांडू नये...

समेट जेव्हा होईल सर्व धर्माच्या माणसांची,
तेव्हाच नांदेल सुख आणि शांती..
अनं खरंच भेट होईल त्या धर्मातील देवाची...

© Prasad Thale
Insta: ananta.speaks
---
#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#marathibana
#inspirational
#writco
#writcoapp