...

2 views

आजोबा ...
मन होत निरागस त्यांचं ,
चेहऱ्यावर होत कायम हसू ,
तेजवान होत रूप त्यांचं ,
असे होते आमचे भाऊ...

बोलणं आहे मधासारख,
काळजी आहे आईसारखी,
प्रेम,आपुलकीने सर्वाशी
सर्वांना कायम हवेसे वाटणारे
आमचे भाऊ ..

कष्टानं पैसा अन् माणुसकी कमवली ,
मूलही देवसारखी निघाली,
पैसा मध्ये कधी लालसा न केली ,
सतत सर्वाची माया केली...

हलाखीची परिस्थिती काढली,
कष्टात सर्व जीवन गेलं,
मस्करी आणि मजेत,
सर्वांना ठेवलं ...

भाऊ आणि आजी ,
म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा,
आम्हा सर्वांची माया माऊली,
कायम रहा सोबत तुम्ही ..

स्वच्छअन् टापटीप
लागयचं सर्व काही ,
नियम अन् वेळ वर ,
सगळ काही लागयाच ....

सुनेला जपल लेकिसारख,
नातवंडांना अंगाखांद्यार खेळ वल,
मुलांना संस्कारी कष्टकरी बनवल,
सर्वांना आपुलकीनं जपल ,
असे होते आमचे भाऊ...

भेटलं नवत कधी अजोबाच प्रेम ,
पण काही दिवसात आपल केलं,
न विसरणारी माया अन् आपुलकी दिली,
अतूट अस नात तयार केलं,
चेहऱ्यावर हसू आल..

तुमची नात,
राजनंदिनी लोमटे..