...

6 views

आकार
आज पुन्हा सावडू,
हा विखुरलेल्या फुलांचा सडा,
आणि विणून देऊ
आकार एका हाराचा,
श्रेष्ठत्व येईल मग त्यासही,
अर्पिता चरणी श्री च्या,
आज पुन्हा सावडू,
फुटक्या घड्याची
विखुरलेली माती,
जणू आकार नवा घेऊ
सज्ज ती,
बनवू दिवे, लावू दारी
मोल वाढी तयाचे,
जेव्हा अंधारावर उजेड
मात करी!!
मग का भय ते ,
तुटण्याचे,अन विखुरण्याचे,
हीच ती संधी,
नव्याने आकार घेऊन,
मोल अस्तित्वास देण्याचे........