...

12 views

आता शोधून मिळणार तरी कशी
तिच्यासारखी दिसणारी,
आता शोधणार तरी किती,
खुळ्यागत प्रेम करणारी,
आता शोधून मिळणार तरी किती...
नशिल्या डोळ्यांनी एकदम
काळजाला भिडणारी ती होती...

जरी मिळाली एखादी,
तरी तिच्यावर जिवापाड प्रेम करणार तरी किती,
ही देखील सोडून जाईल,
याची फक्त मनामध्ये भीती...

समाज, रीतिरिवाज, बंधने,
आता आडवे येणार तरी किती
मी दिलेली पैंजणे,
अजून ती जपणार तरी किती
ओलेचिंब पावसामध्ये,
माझ्याविना भिजणार तरी किती
तापत्या वाळूमध्ये पाऊले,
आता एकट्याने चालणार तरी किती...
खुळ्यागत प्रेम करणारी,
आता शोधून मिळणार तरी किती...

चेहर्‍यावर हसू ठेवून,
डोळ्यातील आसवे आता लपवणार तरी किती
डाव अर्धवट सोडून,
पुन्हा खेळ मांडणार तरी किती
तिच्या आठवणीत एक एक क्षण
आता जगणार तरी किती
खुळ्यागत प्रेम करणारी,
आता शोधून मिळणार तरी किती...