...

3 views

घडवू शकेल का स्वतःला
स्पर्धा परीक्षेच्या युगात
लढवतोय स्वतःला..
ध्येयाने भारुन
जातो जीवाला...

लढून लढून
दमलोय मी आता..
स्वतःला सिध्द
करेल का विधाता..

दृष्टचिंतकांचे बोलणे
हे टोचते जीवाला..
कधी हा संघर्ष
संपवेल का स्वतःला..

जिणं हे जाणतं झालं
सर्वकाही झेपेल का स्वतःला..
मेहनत मोठी केली पण
यश न आलं तर अर्थ काय सात्तत्याला..

अनेकांचे दबाव
दिसतात डोळ्याला..
दडपण येत मोठ
तरी सोसवेना जीवाला..

करून तरी आता
कितीवेळ करायचं..
आयुष्यभर का मात्र
असचं लढत राहायचं..

स्पर्धेच्या अंतिम
क्षणात ओळखले स्वतःला..
कधी न कधी तर
आज धीर सांडला..

Life ही अशी
कशी घडवावी..
Successness ने फुलवून
कधी तरी जगावी..

घरच्यांच्या डोळ्यात
आनंद कधी हा बघावा..
Successful person
कधी तरी मी घडावा..

रखरखलेलं सारं काही
आलबेल झालं नाही तर..
स्वतःला सिध्द
करता आल नाही तर..

जग हे जिण्याजोगं
कसं तरी राहील का..?
आयुष्याच्या वाटेवरी
पाय माझा चालेल का..?

प्रश्न तर कधीतरी
माझे संपतील का..?
भर पडून दुःखाची
सुख वाटेला येईल का..?

सगे सोयरे नातेवाईक
अपयश आलं तर मला accept करतील का..?
Dipression मध्ये
जाऊन मला बाहेर पडता येईल का..?

दहा तोंडानं बोलणारे
माझं म्हणणं एकतील का..?
एवढं सगळं घडल्यावर
संघर्ष स्वतःला संपवेल का..?

तरी निर्धाराने टाकील पुन्हा
निर्भिळ पणाचे पाय..
वेळ ना काळ आता
ना घेईल कुणाची राय..

घेईन कंबरेवरी अंबर
जग पाहीन भरून..
जागवून स्वतःला
यश येईलच घेऊन..

त्या दिवशी मी
आनंदाने नंदिल..
मायबापाच्या डोळ्यात
हरपून जाईल..

तेव्हाच या जगण्याचं
कदाचित सार्थक होईन..
जिन जगून आनंदानं
सुखं वाटेला येईल घेऊन..

--Written by दर्शन बोंबटकार


© All Rights Reserved