...

3 views

विखुरला प्रेमाचा रंग
हसणं माझं गेलं पळून
दुःखाचा हात धरून
माग पाहिलं वळून
माझा आनंद गेला जळून.....!!

मनाशीच मी बोलत होते
सतत केलास माझा रोष
जे काय झाले होते
त्यात माझा काय दोष.......!!

हळुहळु मी जात होती
दुःखाच्या गावी
अन् जगण्याची माझी
हरवली होती चावी.......!!

तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
आजिबात नव्हता अर्थ
तू सतत पाहत आला
फक्तं स्वतःचाच स्वार्थ.......!!

अन् माझ्या असण्यालाही
उरला नव्हता रंग
कारण तू तुझ्यातच
पार झाला होतास दंग.......!!

मलाही वाटे आपल्यावरही
कुणीतरी जीवापाड प्रेम करावं
अन् कधीतरी कुणीतरी
आपल्याही प्रितीत मरावं.......!!

बहुतेक माझ्या नशिबात
नव्हतेच प्रेमाचं सुख
असं वाटतंय माझ्या वाट्याला
आहे फक्तं भरभरून दुःख.......!!

विखुरला प्रेमाचा रंग
मनिषा मिसाळ ( लोखंडे)




© All Rights Reserved