...

53 views

शब्दांनी तूच...
शब्दांनी शोधले तुला...
तुझेच शब्द वाचताना...

शब्दानीं जाणले तुला...
तुझेच अर्थ समजताना...

शब्दांनी गुंफले तुला...
तुझेच मन विणताना...

शब्दानीं गायले तुला...
तुझेच गीत गाताना...

शब्दानीं जगले तुला...
तुझाच जीव जाणताना...

शब्दानीं भेटले तुला...
तुझ्याच स्पर्श अनुभवताना...

शब्दानीं बोलले तुला...
तुझेच भाव ओळखताना...

शब्दांनी मांडले तुला...
तुझ्याच रचना करताना...

शब्दांनी जोडले तुला...
तुझीच प्रीत जाणवताना...

शब्दांनी पुजले तुला...
तुझेच हृदय जपताना...

{Poonam}🖊️