...

13 views

तुझं माझं प्रेमळ नातं....😘
तुच सखा , तूच माझा साथी....!
तु मित्र माझा , तूच पती....!!

सखा जरी असलास तु माझा, माझ्या कृष्णा तरी हे मन केव्हाच तुझं झालंय....
या मनाने तुझ्या मनावर जिवापाड प्रेम केलंय....
माझ्या मनाने तुझ्या मनाशी अतुट रेशीमबंधाचं अगदी घट्ट नातं पुढच्या सात जन्मासाठी नातं जोडलयं....!

माझ्या मनाने तुला केव्हाच "वरलंय"....!
या मनाने तुला माझा पती केव्हाच मानले आहे.
या मनाने प्रत्येक क्षणी फक्त तुला आणि तुलाच तर "स्मरलंय"....!


मी तुझी पत्नी जरी नसले या जन्मी ,तरी या माझ्या वेड्या मनाने कधीच तुला
"माझा पती मानलंय".....!

आपलं नातं हे समजूतदारपणा, स्वतःपेक्षा जास्त एकमेकांवरील विश्वास, प्रामाणिकपणा खरेपणा आणि सत्याच्या ,आपुलकीच्या प्रेमाच्या आधारावरच तर आपलं खास जगावेगळे "मैत्रीचं नातं" हे आजवर आपण दोघांनी खुप छान पद्धतीने जपलयं....!


खरंच किती सुंदर नातं आहे ना आपलं....या नात्याला मी जिवापाड, जिवापेक्षाही जास्त जपलंय.... कधीच कोणाची दृष्ट ना लागो , ना कोणतेही गालबोट आपल्या नात्याला हेच तर वेळोवेळी मी देवाचरणी मागणं मी मागितलंय....!!🙏🏻😊
Miss you so much....😘😘 😘


तुझीच
नंदिनी उर्फ जिज्ञासा....✒✍🏻