...

8 views

तुझ्याच पापण्यांत, मी द्वंद्व पाहिलेले...
छन छन पैंजणांची, चाहूल मज आली...

ती चांदरात आली, ती प्रीतसाक्ष झाली...



तुझ्या डोळ्यांत राणी, मी स्वर्ग पाहिलेले...

तुझ्याच पापण्यांत, मी द्वंद्व पाहिलेले...



वाऱ्या सवे तु आली, मजला स्पर्शुन गेली...

चतकोर पावलांनी, हळुवार खेळून गेली...



जे जीर्ण जाहलेले. वृक्षाचे पर्ण ते ही...

लाजाळुनी भाळी, गाळुन आज गेली...



हर्षुन चंद्र नभी, का पाहतो तळ्यावर...

मन चोरले तु माझे, नावं कोरले तयावर...



ते चांदणे नभीचे, श्रुंगारूनी गेली...

या क्षत पामराला, झंकारुनी गेली...
© SURYAKANT_R.J.