...

8 views

तुझ्यासाठी
आज नि उद्या तुला
प्रेयसी म्हणून पाहीन
तुझ्यासाठी प्रेमाची
गाणी मी रोज गाईन
तुझं साठीच प्रेमाचे पाखरू होईन.

घाबरू नकोस तुझंसाठी
जीवनदान ही देईन
वेळ येता परीक्षेची
अग्नि पार मी करीन
पण एकदा तुझा हात हातात घेईन.

किती जरी नखरे केले
तुझे नखरे मी सहीन
नजरेतून दूर केले तरी
तुझ्या हृदयात मी राहील
तुझ्याच साठी प्रेमाची गाणी मी गाईन.
लग्न नाही केले मजसोबत
मी ब्रह्मचारी ग राहीन
अजन्म तुझ्या आठवणीची
शिदोरी जपून ठेवली
तुझ्याच साठी प्रेमाची गाणी मी गाईन.

दूर केले हृदयातून तरी,
गुलाब घेऊन येईन,
तुझ्या सोनेरी केसांचे,
अलगद चुंबन मी घेईन,
तुझ्याच आठवणीत हरघडी हरवून जाईन.....

© ashwmegh