...

13 views

soulmate
वाट पाहत आहे त्याची,
आत्म्याच्या त्या अर्ध भागाची,
मिळता क्षणीच ज्याच्या,
होईल जानिव, पूर्णत्वाची,
तोडून सारें धागे भूतकाळाचे,
ज्याला समज असेल वर्तमानाची,
उमगलं असेल त्याचे त्याला,
की मी त्याच्या साठी,
असेल भय जरी उरी,
पण ठाम विश्वास प्रेमावरी,
झालीच कधी चूक माझ्याकडून,
तरी समजून सांगेन  एका गुरुपरी,
लाखो जरी झाले विरोधात,
निडर तो, धरील हातात हात,
विना शब्द दाखवून देईल
त्याच्या प्रेमाची अतोड गांठ,
माझ्या सुख दुःखाचा साथिदार,
माझ्यातल्या बाल मनाचा साक्षीदार,
कधी वाटलंच जावसं दूर,
तर मुक्त तो ,जाईल ही,
पण आदर प्रेमाचा ठेवून..