...

4 views

त्या जुन्या वाटा....
त्या जुन्या वाटा,
त्या मंद लाटा,
धुक्यात विरल्या तुझ्या,
किती आणाभाका.
साथ एकमेकांची,
कधी ना सोडायची,
या अशा वचनांची,
याद मला छळते.
सांज समुद्रकिनारी,
हात हातात जरी,
मन तुझे असे दुरी,
मला न उमगले.
प्रेम होते मनी जरी,
चित्त तुझे असे घरी,
आज मला कळते तरी,
मन कसे मानेल ?


© Vasant Kulkarni