...

17 views

कविता... गुरू आयुष्याचे
अगदीच रिकामा घड्यासारख्या
​कोऱ्या करकरीत मनावर
​उमटवून पांढऱ्या खडूंची अक्षरे
​शिकविले गुरूंनी काळ्या फळ्यावर...

​साधाच पेहराव त्यांचा
​प्रभाव भारीच व्यक्तिमत्वाचा
​आकार, आधार दिला आयुष्याला
​उच्च संस्कार आणि ठेवा तो अमर्याद ज्ञानाचा...

​आईबाबानंतर गुरूच मार्गदर्शक शिल्पकार
​ज्ञानाच्या शिदोरीने भरभरून दिले
​परिस्थितीशी लढण्या सक्षम आणि खंबीर बनवत
​जगावे कर्तव्य पथावर प्रामाणिकतेचे धडे शिकवले

​मोलाचे वचन गुरूंचे​ शालेय शिक्षणा नंतरही आयुष्यात तील कठीण प्रसंगी ​अनुभव येतील बरेच तेव्हा माझ्या ज्ञानानंतरही अनुभवातून
​शिकावे बरेच.. ​जगतांना गुरू त्यांना बनवावे...

​ शोभा मानवटकर....


© All Rights Reserved