...

3 views

निपचित......
निपचित....

निपचित पडलाय गाव सारा
शासन, प्रशासन दोघांमध्ये कर्मचाऱ्याचा झाला कोंडमारा
घराबाहेर पडताच कलम लागेल
न पडताही कलम चालेल
नाही गाडी, नाही शिवशाही
हृदयात कायम जपतोय लोकशाही


शासन म्हणतंय चौकटीतच थांबा
प्रशासनाचं पत्र तांदूळ, कडधान्य वाटा
काय करावं कोंडमारा झालाय
पहिल्यांदा जीव केविलवाणा मुकलाय
आग आणि फुफाटा समप्रमाणात भासलाय
असा झालाय कर्मचाऱ्याचा कोंडमारा

कर्तव्य आम्हासही बजावणे हाय
पण कुणाला आमच्यावर भरवसा न्हाय
निघालो घरातून तर जागोजागी लाठीमार हाय
जीवाला नाही महामारीला घाबरतो
गावकरी लोकांच्या प्रकृतीला जपतो....

ज्यांच्या नावाखाली आमचं उदर भरतं
तेव्हा अंतःकरण आमचं अविरत कर्तव्य करतं
प्रत्येक मुल धान्य घेईल
एकही मुल वंचित न राहील
अन्नासाठी हरलाय गाव सारा
असा झालाय कर्मचाऱ्याचा कोंडमारा
निपचित पडलाय गाव सारा
निपचित पडलाय गाव सारा.....

........@शालिनी सोमकुंवर @...