...

15 views

मन भावना...
गुलाबापरी, तुझे माझे नाते...
तू फुलं, मी त्या गुलाबाचे काटे...
टोचला ना काटा, माझ्याकडून तुला...
फुंकर घातली शब्दांची जखमेला...

समजू शकलास अबोल माझ्या भावनेला...
आवर आता स्वतःचं स्वतःला...
आजचे क्षणभर दुःख, वेदना देईल...
उद्या साठी सगळं काही, ठीक होईल...

बंधनं आहेत, सगळी कडून मनाला...
फसवायचं नाही, स्वतःचं स्वतःला...
शब्दांचे खेळ, भारी खेळतोस माझ्याशी...
शब्दांत ही हारले, मी आज तुझ्याशी...

आवडेल मला तुझ्याशी हारायला...
फक्त वेदना देऊ नकोस तू तुझ्या मनाला...
समजावून सांग येणाऱ्या क्षणांना...
जगायचं कसं असतं, शेवटी एकट्याला...

{पौर्णिमा}🖊️