...

31 views

आठवणींच्या सांजवेळी...
आठवणींच्या सांजवेळी...
भेट आपली वेळी अवेळी...
तू निघावे भेटाया मज
मी तुझी वाट पाहावी...

आठवणींच्या सांजवेळी...
शांत लाटा समुद्र किनारी
मी उभी तिथे पाहत तुला
नजरेला तुझी नजर मिळावी...

आठवणींच्या सांजवेळी...
तू ऊन मी तुझी सावली
पाठशिवणीचा खेळ दोघांचा
रोज चले भर दुपारी...

आठवणींच्या सांजवेळी...
अचानक स्पर्श तुझा
मनाला माझ्या पडे भारी
स्वप्न नसून सत्य असावे
फक्त तू अन् मीचं संगती...

{Poonam}🖊️