...

21 views

तु......
तु ठेवुन गेलास मागे खुप सारे प्रश्न
भोगलेल्या यातना आणि काही अधुरी स्वप्न
यशाची शिखरे जिद्दीने चढला
मग का रे तुझा पाय असा घसरला
गेलास चटका लावुन सगळ्यांच्या मनाला
पण का थांबवल नाहीस मनाच्या वादळांना
तुझी उणीव चाहत्यांना नेहमीच भासेल
जन्म दात्याच्या आसवांना कोण थांबवेल
अजून थोडा लढला असतास
गनिमांनचा डाव मोडला असतास
आम्हाला ही वाटते अजुन थोडा थांबला असतास
अजुन थोडा थांबला असतास.......