...

7 views

कॉलेज कट्टयावरील एक आयुष्य

आजही आठवतो कॅन्टींग मधला तो कटिंग एक चहा
आणि त्या चहा सोबत इच्छा नेहमी खायची वडापाव,
आपल्या खिशात पैसे कुठले होते जास्त तेव्हा
एकमेकांकडूनच थोडे थोडे गोळा करायचो आपण राव,

कॉलेजच्या आवारात मित्रपरिवार घेऊन बसणं तेही लेक्चर चुकवून
आणि एकमेकांचीच चेष्टा करण हेच चालायच नेहमी तेही स्वतःच भान विसरून
समोरून जाताना दिसलीच एखादी पोरगी आणि हसली मागे फिरून
तिथेच झुरत बसायच लांबूनच डोळ्यांनी तिला बघून

जर कधी बसलोच चुकून तेही लेक्चरला
तरी जमीन विकत घेतल्यासारखा मालकी हक्काचा शेवटचा बाक नेहमी आपला ठरलेला
समोरच्या बाकावरच्या पोरांच्या वहीमध्ये अभ्यास असायचा उतरवलेला
आणि आमच्या वहीमध्ये मात्र आमच्या ग्रुपच नाव दिसायचं कोरलेला

परीक्षा जरी आली जवळ तरी मोबाईलमध्ये दंग असायचो व्हाट्सअँप ग्रुपवर त्या वेळी रात्रीच्या
आपल्याला अभ्यासाच्या नावाने नेहमी बोंबा बोंब म्हणून रात्रभर एकच चर्चा असायची आपली नक्की कॉप्या नक्की कश्या करायच्या
परीक्षेच्या आदल्या दिवशी अश्याच गप्पा आपल्या नेहमी सगळ्यांच्या रमायच्या
रातभर कॉपी करण्यासाठी कागदावर लिहून लिहून पेनांच्या शाहीच संपायच्या

कधीतरी ठरायचा प्लॅन सगळ्यांचा फिरायचा
तेव्हाही खिसा खालीच काहींचा असायचा
एखादा मित्रच तेव्हा पैसे आपले भरायचा
प्रत्येक वेळेस कॉलेज कट्टाच मदतीला धावून यायचा....

कवी :- पै स्वहित कळंबटे



© @Swa_hitkalambate 1044.