...

4 views

Rose
तु दिलेला गुलाब
आणि मी तो माझ्या डायरीत जपून ठेवणे हा लहानपणीचा खेळ नाही!!
फक्त तुझी असलेल्या माझ्यासाठी तर नाहीच मुळी
हि एक अनंत वाटचाल आहे ,तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक अगणित क्षणांची !!!
आणि तितकीच निखळ आनंद देणारी !!!
तो रेंगाळलेला दिवस आणि केलेली भटकंती !
सावली बनून वेदनेच्या उन्हा वर
राज्य गाजवलेला तू ..
तुझ्या पाठीवर भारहीन होत अंग टाकलेली मी...
या दोन्ही अचानक जन्माला आलेल्या प्रेमविकल कथा
आज मावळतीला ही अंधाराला हरवत तो दिप तेवतो आहे
त्या स्पर्श गंधाने आकर्षित मी माझा मांडलेला भातुकलीचा संसार !!
बघ क्षितिजावर थांबलेली केशरी पहाट पुन्हा मोगर्याला एक बहाणा देऊन जाईल.
आणि मावळतीला आलेल्या थरथरणार्या हातावरील रेषा आपल्या हातांची ओंजळ करून चंद्र फुलवतील आपल्या दोघांमधील आभाळाला आपलेसे करून !!
आपल्यानंतर येणारा उद्या या आभाळातून चांदण्या मोजत राहील.
आपणही राहू मग कुठल्यातरी गॅलरीतून फ्रेंच विंडीज मधुन डोकावणारा मोगरा बनुन
पण मी तशीच राहीन तुझ्यासाठीच फक्त
डायरीतील तु दिलेला गुलाब 🌹


© Bkt...