...

2 views

वारकरी ...🚩
न संसाराची ओढ ,
न जीवाची काळजी ,
पंढरीची वाट विठ्ठलाची भेट ,
करावया निघाला वारकरी ....

माऊली म्हणे सर्वजण ,
मधुर आवाजात असे भजन ,
अन् फुगडीचा ताल,
मन होते प्रसन्न ,
जेव्हा होते वारकऱ्यांचे आगमन .....

न कशाच गर्व , न कशाची आशा ,
फक्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ ,
मन आहे पवित्र ,अन् निस्वार्थ भक्ती ,
म्हणून तर हजारो मैलांचा प्रवास करून ,
येतात हे वारकरी ....

वेदना होतात शरीराला ,
तरीही पायी चाले वारकरी ,
विठुराया आहे सोबत ,
तोच करतोय वारी पूर्ण ,
असा वारकऱ्यांचा विश्वास ...

निवाऱ्याची ,अन्नाची चिंता नाही ,
जसं असल तशात आनंदी ,
दिवस रात्र हरीचा जप मुखी ,
हा विठ्ठलाचा दास माझा वारकरी ....

कपाळी बुक्का,गळ्यात तुळशी माळ ,
डोईवरती तुळशी वृंदावन ,
हातात टाळ घेत ,
भजनात दंग होऊन चाले ...
पंढरीचा वारकरी ...

पाऊस , उन थंडीची परवा नाही ,
सुखाचा त्याग करून ,
निस्वार्थी होऊन देवाची वारी पूर्ण करतो ..
असा तो मनाने श्रीमंत असणारा देवाचं प्रिय असणारा माझा वारकरी ...

वारी होते पूर्ण ,
दर्शनाची ओढ पूर्ण होते ,
मुख बघताच डोळयात येतात अश्रू ,
चेहऱ्यावर असतो आनंद ...
ते असत समाधान ....


राजनंदिनी लोमटे ...