...

8 views

एक ना एक दिवस
एक ना एक दिवस
आपल्याला हे जग
सोडून जायचचं
हे तर शतशिध्द
तरी पण.....
लोकं गरजे पेक्षा
अधिक धन संपादन करतात
असं.....
भ्रमित जीवन का जगतात ?
एक ना एक दिवस
आपलं अस्तित्व
मिटणार आहे
हे माहीत असूनही
लोकं एकमेकांत
व्देष-आसुया बाळगतात
असं.....
मायावी जीवन का जगतात ?
एक ना एक दिवस
आपला हा देह पंचमहाभूतात
विलिन होणारच
हे जाणून सुध्दा
अहंभाव मिरवतात
असं.....
अज्ञान अंधकारमय
जीवन का जगतात ?
का जगतात ?
हा यक्ष प्रश्न
अंतर्मन सांगेल
उठवू या। !
जागे होऊ या !
जाग्रतेन दिव्य चेतन
आनंदमय जीवन जगु या......
© आत्मेश्वर