...

9 views

आई बाबा!
दाट अंधारात मनाला वाट दाखवणारे चंद्रासारखे बाबा,
हळूच मायेने चांदण्यांची चादर पांघरणारी आई.

मला फुलासारखं जपणारी माझी आई,
मला मुळापासून मजबूत करणारे बाबा.

वेळेच्या आधीच उठविणारी आई,
आणि वेळे सोबत चालायला शिकवणारे बाबा.

माझ्यासारख्या दिव्याची ज्योत आहे आई,
आणि माझे इंधन म्हणून त्यात तेल आहेत बाबा.

माझ्यामध्ये मनाच्या श्रीमंतीच झाड लावलं आईने,
आणि खतपाणी घातलं विचारांचं त्यात बाबाने.

खेळ खेळायला शिकवणारी आई,
खेळांचे नियम समजावणारे बाबा.

पडल्यावर काळजीने मला उठविणारी आई,
आणि पडल्यावर मला पुन्हा उभा राहायला शिकवणारे बाबा.

मला बुद्धिबळ शिकवणारी आई,
पण त्या बुद्धीचा वापर करायला शिकवणारे बाबा.

कष्टाचे मोल सांगणारी आई,
आणि कष्ट करायला शिकवणारे बाबा.

अशा या माझ्या प्रगतीच्या इमारतीचा,
भक्कम पाया आहेत माझे आई बाबा !!