...

5 views

आयुष्य
आयुष्य हे असंच असतं..
काळाभोवती फिरत असतं..
उठता बसता दिसत असतं..
न कळता जगता येत असतं..

निर्धाराच्या वाटेवर सतत ठाम असतं..
जीवनाचं सार्थक करणं त्याचं काम असतं..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळ तुझ असतं
भरलेल्या डोळ्यांनी पाहून आत्मसात करायचं असतं..

जगून जगून जगायचं असतं..
विचारांच्या समुद्रात शब्दांचे मोती बनून राहायचं असतं..
स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं..
म्हणूनच तर आयुष्य जगायचं असतं...

भरभराटीचं समृध्दी, सुख मिळवायचं असतं..
बरचं काही साध्य करायचं असतं..
जीवन हे असच जगायच असतं..
आयुष्य हे असंच असतं..

काळ हा येतो नी जातो पण आयुष्य सुरूच असतं..
कसंही असलं तरी ते जगायचं असतं..

__D.R. Bombatkar