...

0 views

जगावेगळा राजा शिवछत्रपती*
*जगावेगळा राजा शिवछत्रपती* 
===================

चार शतक होत आहेत तुमच्या जन्माला
तरीही तुमची  जयंती 'उत्सव' म्हाणून साजरी करावी वाटते..
त्याच कारण ही  तसच अहे;
तुम्ही घडवलेली क्रांती,होय क्रांतिच!

ज्यावेळी कुणाच्या मनात येत नव्हतं ..
ते स्वराज्य तुम्ही उभारलेत .
मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ,
शौर्य आणि अपार करूनेच्या सामर्थ्यावर
केलीत नव्या युगाची सुरुवात !

"शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका ",
असं म्हणून फक्त तुम्ही थांबला नाहीत ,
तसा अनुभव रयतेला दिलात !

शेतसारा गोळा करण्याची जुलमी रीत बंद करून,
न्याय्यी व्यवस्था निर्माण केली,सरकारी अधिकारी नेमून.
राज्याच्या तिजोरी पेक्षा, रयतेच्या पिकांची
तुम्ही जास्त काळजी केलीत,
दुष्काळ प्रसंगी जनतेसाठी ;
राज्याची तिजोरी खाली केलीत !

महिलांचा अपमान तुम्ही कधीच सहन केला नाही ...
मग ती कुठल्याही जाती धर्माची असो!
'त्या' तरुणीला दिलेली मायेची हाक,
आजही अंगावर रोमांच उभा करते,
हृदयात खोलवर शिरून!

न्याया वरची अपार निष्ठा ,
निष्कलंक चारित्र्य आणि,
सौंदर्याकडे पाहण्याची निरोगी दृष्टी
तुम्हाला जगावेगळा राजा बनवते!



तुम्हाला एका  जाती धर्मापुरते मर्यादित करू पाहणारे,
कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत .
कारण तुम्ही होतात मानवतेचे पुजारी,
येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी तुम्ही एक विचार आहात .
जो की प्रत्येक व्यक्तीला ...
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहील !

    
छत्रपति शिवाजी महाराज की जय

               लेखक सुरज तायड़े
© All Rights Reserved