...

7 views

गुलाबी थंडी
"आज रात कोजागिरी,
गेली सांगून काहीतरी..

आज मी धुंद,
माझ्यातच बेधुंद,
गीत प्रितीचे ओठावरी,
जणू एक मर्मबंध..
अनुभवता हे सारे
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..

पदर माझा चमचमता,
त्यावर चांदण्यांचा गलका,
पाहून या मनकवड्या वेडीला,
चंद्रही होतो बोलका..
छेडीता अल्लड सुर हे सारे..
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..

तू मला पाहूनी
वेडावशील त्या तिथे,
हाती हात धरून सखीचा,
धावशील माझी अंतरे..

स्वप्न तुझे हे
गुलाबी होईल खरे..
आज रात कोजागिरी
गेली सांगुन काहितरी..

मला पाहशील तू
डोळ्यात सखीच्या,
जाग्या होतील स्पर्शरेषा,
एका नाजूक भितीच्या..

तिला अर्थ मिठीचे
समजावून सांग रे..
अशी आज रात कोजागिरी,
गेली सांगुन काहितरी..."

!