...

10 views

निरागस प्रेम
हळव्या नजरेने पाहतो,
मनात माझ्या पाप नव्हते.
हृदयातून मला तोडलेस,
आकाश मजला नको होते.
फक्त तुझ्या प्रेमाचे दान,
मागितले होते.
हरघडी पाहत होतो,
शरीर मजला नको होते.
तुझे नाजूक मन तर,
मागितले होते.
तुझे लांब केस नको होते,
त्यातील काळे पण हवे होते.
प्रेम तुला मागितले ,
कडवे बोल नको होते.
तुझंकडे पाहत होतो,
मनात मात्र काहीच नव्हते......!




© ashwmegh