...

0 views

मृत देह ही आज बोलाय लागले
मृत देह ही आज बोलाय लागले


जिवंत मानवांच वागण पाहुण
मृत देहही आज बोलाय लागले
झीजवला देह आम्ही अमुल्य
ते व्यर्थ जात आहे म्हनाया लागले

अस्पर्ष मातीचा दुर सारला
तरी जातीवाद आहे समजाय लागले
हार झाली तुमच्यापुढे आमुची
चुक झाली म्हनाय लागले
मृत देह ही आज बोलाय लागले

डाव गुलामीचा मांडलेला मोडला
तरी मानसीक गुलामीत पाहु लागले
देह झुजारला पण मनाच काय ?
स्वत:स प्रश्ण विचाराय लागले
मृत देह ही आज बोलाय लागले

माय बहिणींची आब्रु खंजीराणे वाचवली
लिपीस्टीक च्या लालीत चमकताना पाहिले
भरीव कपड्यांचा पेहरावा
छोटी फॅशण ऐकुन राहिले
मृत देह ही आज बोलाय लागले

शिक्षण होते ज्योतीबांचे निस्वार्थी
सद्यस्थीती पैषांची लुट होताना पाहिले
स्वार्थी ; गिढडी कलीयुगात या
बाप पोरांची चुल वेगळी होताना पाहिले
मृत देह ही आज बोलाय लागले

बलात्काऱ्यांना रात्रीतुन शिक्षा न देता
सरकार बनवताना पाहिले
मिडीयाचे सुत्रांचे आधार ऐकत
जिवंत भावनांची राख होताना पाहीले
मृत देह ही आज बोलाय लागले

सरकारच अश्वासन न्हवे तर
अश्वासनावर सत्ता मिळवताना पाहीले
घराला लागलेल्या आगीलाही
थुंकीने विझवताना पाहिले
मृत देह ही आज बोलाय लागले

जिवंत मानसे ज्या वेळी नाही बोलत
त्या वेळी आम्हाला शब्दरुपे अनेकांनी पाहीले
मृत असुनही आम्ही...
जिवंतीचा सबुत देताना तुम्ही पाहिले...

असे म्हणता म्हणता ते शब्दप्रहारात सामील झाले