...

6 views

तुझा नकार
कधी हसवशी , कधी रडवशी,
रागाने का अशी पाहशी,
कधी -कधी का अशी वागती.

तुझ्याच साठी लागलो झुरनी,
तूच जीवनाची मरंजनी,
अलंकार माझ्या जीवनाचा,
आहे तुझा होकार मोलाचा.

काहीतरी जळले कधी ते जळले,
नाही कुणा ते कळले,
कशामुळे नाते हे जुळले,
हृदय माझे हरघडी जळले.

तुझा सुगंधी सुवास मनाला,
मनचं जळले सुवास कशाला,
काळीज का करपूनी गेले,
मला वाटते भलतेच झाले,
तुझ्या नकाराने ते जळले.

खरेच का आपले नाते जुळले,
स्वप्नांचे धागे तळमळले,
निष्पाप हृदय माझेच का जळले.

© ashwmegh