...

1 views

🙌भगवंत 🙌
चेहऱ्यावर तेज अन् प्रभावी शक्ती पाहताच ,
सुख ,शांती मन प्रसन्न होत ,
सर्वत्र तूच आहे ,
तुझ रूप अन् कीर्ती महान आहे
असा माझा भगवंत आहे 🙌

राम, कृष्ण ,वामन अवतार घेतले ,
अन् दृश्टांचा संहार केला,
जगावं कसं भगवद्गीता दिले ,
मरण कस असत ,हे भागवत मध्ये दिलं ...

पाप केलं तरी मुक्तीसाठी काशी केली ,
राम कृष्ण हरी जपाने पवित्र मन केलं ,
धर्म ,कर्म , कर्तव्यासाठी जन्म घेतले ,
अन् सर्वांचा उध्दार केला .

विज्ञान चे शोध आहेत ,पण दृष्टी अन् बुध्दी देणारा तूच आहेस ,
तुझ्याविना जगणं अशक्य आहे ...

माणसाला लागतो पैसा ,पण तुला लागतो भाव
भक्तांचा संहार करण हा तुझा धर्म ,,

कर्तव्य कधी चुकवू नये ,
शाप कधी टळत नाही ,
माफ करू शकतो ,पण कर्म कधी चुकत नाही ...

जन्म मरणाचा खेळ नको आता ,
तुझ्या चरणाशी कायम रहावं ,
अन् या जीवाला मुक्ती मिळावी ,
तुलाच समर्पित व्हावं ..

🙌राम कृष्ण हरी 🙌

राजनंदिनी लोमटे