...

4 views

होळीच्या साक्षीने
गाण्यांच्या तालात, अबालवृद्धांच्या जल्लोशात,
पाण्याच्या माऱ्यात, अनं रंगांच्या उधळण्यात,
होळीचा आनंदास मिळते गोडीची जोड,
कटाच्या आमटीसोबतच्या जेवणात,
अनं दुधासोबत पुरणपोळी खाण्यात...

शुभेच्छा संदेशात, दिसते ओढ मायेच्या माणसांत,
आठवणी घेऊन येते परत, रंग, चैतन्याची होळी,
होताच सुरू दहन.. होती शांत सारी मनं,
अनं पवित्र त्या होलीकेच्या साक्षीने
सर्व मंगल कार्यांचा निश्चय करती सगळी...

अग्नितही भक्ती नं शमली, ईश्वर महिमा जाहली,
भक्त प्रल्हादास अग्निची झळही नं लागली,
होलीकेच्या दुर्गणांची राखरांगोळी राहीली..
सदा व्हावं सर्वांचं भलं, हीच मनी मंगल कामना,
होळीच्या साक्षीने दृढ होवो साऱ्यांच्या शुभसंकल्पना...

© Prasad Thale
Insta: ananta.speaks

#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#writco
#writcoapp