...

9 views

तू असल्यावर.
तू असल्यावर
तू असल्यावर
तू असल्यावर

पाहूनी लाजे कलिका कोमल,
रंग बावरी सांज ती शामल.
घेती विहंग नभ पंखावर,
तू असल्यावर.

फुलूनी आल्या बागा सुंदर,
पाहूनी हसती भृंग निरंतर.
होता स्पर्श वायू राजचा,
लाली चढली ह्या देहावर.
तू असल्यावर.

पहाट ही ती काय म्हणावी ?
कुशीत तुझीया जाग हो यावी.
मऊ रेशमी केसात तुझीया,
गुंतून जावे वाटे क्षणभर.
तू असल्यावर.

दिवसा ढवळ्या भास तुझा हा,
प्राणांकित ह्या श्वास तुझा हा.
काय बरं ही किमया झाली?
सध्या भोळ्या ह्या चित्तावर.
तू असल्यावर.

© वि.र.तारकर.