...

2 views

थकलीस ना...
थकलीस ना...
तू थोडी थकायलाच पाहिजे
कारण तू मुलगी आहेस ना..
तुला सगळं यायलाच पाहिजे.

स्वप्न तुझं पूर्ण कर तू
पण घर सांभाळणं
तुला यायलाच पाहिजे
कारण तू मुलगी आहेस ना
तुला सगळं यायलाच पाहिजे

आई-बाबाने लाडाने वाढवलेली तूला
पण सासरी गेल्यावर नवर्याची कामं
तूने केलीच पाहिजे..
कारण तू मुलगी आहेस ना
तुला सगळं यायलाच पाहिजे

असूदे हो मुलगा कितीही निर्लज्ज
पण संस्कार तुझ्यात असलेच पाहिजे
कारण तू मुलगी आहेस ना
तुला सगळं यायलाच पाहिजे

लग्न तर मुलाला हवं तसं करूदे हो
पण समाजाचा विचार तुने केलाच पाहिजे
कारण तू मुलगी आहेस ना
तुला सगळं यायलाच पाहिजे

आई-वडीलांवर तुझं कितीही प्रेम असूदे
पण त्यांच घर सोडून शेवटी तूलाच जायचय
कारण...
तू मुलगी आहेस ना
तुला तर सगळं यायलाच पाहिजे