...

5 views

मोरया
मोरया

संतृप्तता मनाची
आहे तुझ्या चरणी ।
गणराया तुझे नाम
रुजले अंतःकरणी ॥

गोडी तूझ्या भक्तीची
करे प्रसन्नतेची पेरणी ।
मिळे सारा विश्वानंद
जेव्हा असशी तू स्मरणी ॥

आराध्य तू सम्रृद्धीचे
आहेस चिंतामणी ।
रूप तुझे बळ देई
पाठीशी तूक्षणोक्षणी ॥

-साक्षी गौरवार.