...

11 views

🤫🤫🤫
राजनिती षंढ आहे
नेत्यांना घमंड आहे ;
नारीच्या अस्मितेचा
प्रकोप प्रचंड आहे ।
सत्ता खलबत्ता आहे
स्वार्थी सूव्यवस्था आहे ;
किड्या माकोड्यागत ही
प्रजेची अवस्था आहे ।
झाशीची ती विरांगना
शुर सिंहिनी कंगना ;
घायाळ त्या ललनेची
करी क्रूर प्रताडना ।
कोणी न बोलावे काही
सत्ताधीश ते प्रवाही ;
हातात त्यांच्याच आहे
राज्याची ह्या लोकशाही ।
ती एक अबला नारी
पडली सत्तेवर भारी ;
फुत्कारती प्रतिध्वनि
जशी नागीन विषारी ।
एकटा तू वीर नाही
सत्ता ही जागीर नाही ;
सिंहीनीच्या आक्रोशाला
जिवाची फिकीर नाही ।
गर्व जो तुला एवढा
जणू अश्वमेध घोडा ;
अतुल्य अहंकाराचा
आहे आव तुला खोटा ।
शिवाला कर याद तू
परमेश्वर तो स्वयंभू ;
सत्यं शिवं सुंदरम
कसा विसरलास तू ।
सत्य नाशवंत नाही
निराशेला खंत नाही ;
अनैतिकता चा कुठे
अस्तित्वात प्रांत नाही ।
सत्ताधीश तू आतूर
राहशी नशेत चूर ;
शाशणाच्या पतनाचा
नाही दिवस तो दूर ।

✒️ कवी ;
🇮🇳 विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी