...

16 views

🕊️ संघर्ष ✍️
नाव पाण्यातून जाते, शोध किना-याचा घेते !
नवा किनारा शोधूनी,जीवनास जगविते !!

पक्षी उडती आकाशी, शोध भुकेचा घ्यायला !
बाळ खेळते पाण्यात (जीवनात), पक्षी नावेस पाहूनी !!

वेळ आहे रे संघर्ष, आनंद संघर्षाचा !
संघर्ष जीवनाचा, जीवन संघर्षाचे !!

जेव्हा थांबेल संघर्ष, वेळ घेईल परीक्षा...

तेव्हा...

दूर जाईल किनारा,नाव वाहूनी पाण्यात !
दिशा भटकेल पक्षी,पंख थकूनी जाईल !
शोध होता त्या भुकेचा, तो अधूरा राहिलं !!
शोध होता त्या भुकेचा, तो अधूरा राहिलं !!!

© Gautam