...

9 views

अंडाकरी...
अंडाकरी ...



तेल टाकलंय तव्यात, गॅस केलाय कमी...

कांदे थोडे चिरून, लसूण टाकलंय कमी...



थोडा कडीपत्ता, थोडी जिरा मवरी ...

ताड ताड आवाज आला, लाल झाली नवरी ...



आता थोडं खोबऱ्याचं वाटणं, थोडं मीठ पाणी..

ठसका आवरून घोळून घेऊ, कढईतलं लोणी...



आता हळुच उकडलेली अंडी त्यात सोडु ...

कालथीनेच प्रत्येकाची कंबर ही मोडु ...



उकळ येईल तोवर धीर थोडा धरू...

अंडाकरीचा गंध दरवळल्यावर ताव त्यावर मारू...


© SURYAKANT_R.J.