...

0 views

किळस येते हो...!
छातीच्या रुंदाईवरून अन् कमरेच्या मंदाईवरून तिची बोली लावणारे ही जेंव्हा स्त्रीवादाच्या गप्पा मारताना तेंव्हा....
किळस येते हो !!

दोन तासात अत्तराचाही सुगंध संपतो
अन् त्यानंतर दरवळतो तो फक्त तिच्या
घामाचा अन् कामाचा सुगंध
तरीही आम्ही फॉगमध्ये राहतो तेंव्हा....
किळस येते हो !!

तिला प्रपंचाची गाडी चालवण्यासाठी
साडी बदलावी लागते
अन् आम्ही आमचा क्रूरपणा शमविण्यासाठी तिची नाडी फेडतो
तरीही तीच वेश्या ठरते तेंव्हा....
किळस येते हो !!

घरातील दिवा तेलाविना तेवत ठेवणाऱ्या
अन् वेशालयातील कंदील टीमटीमवनाऱ्या
माणसातील षंढ श्वापदे जेंव्हा त्या लक्ष्मीला
रंडी म्हणतात तेंव्हा....
किळस येते हो !!

तिला पूर्ण कराव्या लागतात
यांच्या बाहेर धिक्कारलेल्या तऱ्हा
मन मारून अन् तन देऊन
त्याक्षणी ती यांची सुखवस्तू असते
तर दुसऱ्याच क्षणाला ती भोगवस्तू ठरते तेंव्हा...
किळस येते हो !!

सरडा रंग बदलतो ऋतूत सामील होण्यासाठी
उमेदवार पक्ष बदलतो स्वार्थासाठी
पक्ष रंग बदलतो मत मागण्यासाठी
पक्ष माणसं बदलतो जिंकण्यासाठी
वेश्या साडी बदलते पोटाची खळगी भरण्यासाठी
यांना मात्र समाजभूषण मिळते
अन् ती मात्र वेश्या ठरते तेंव्हा....
किळस येते हो !!