...

13 views

वार - तिच्या नजरेचा
"वार- तिच्या नजरेचा"
काय वार तिच्या नजरेने केला
मनात माझ्या जाऊन शिरला
ओढणी तिच्या अंगावरची
चेहऱ्याला माझ्या झाकून गेला
तो वार तिच्या नजरेने केला

तो वेळही अगदी तिथेच थांबला
जिथे तिचा वार सुटला
माझ्या मनातल्या भावना जागवून
स्वतःच कुठेतरी हरवून गेला
तो वार तिच्या नजरेने केला

तिच्या नाजूक मंद हास्याने
अनोळखी ओळख देऊन गेला
कधी न केल्या विचारात टाकून
काही न बोलता निघून गेला
तो वार तिच्या नजरेने केला

श्वास त्याच्यात माझा रोखून
आवकाश ही ओलांडून गेला
कधी न झालेल्या भेटीलाही
निस्वार्थ आठवण देऊन गेला
तो वार तिच्या नजरेने केला

जाता जाता जीवनाला माझ्या
काहीतरी तो सांगून गेला
शेवटच्या त्या क्षणालाही
जीवनभर असा सजवून गेला
तो वार तिच्या नजरेने केला
- तुषार सुचिता सुरेश घरडेकर
#tushar_ghardekar #WritcoQuote #google #instagood #yourquote #Quotesbyme #poemoftheday #Poetry #Poetry #hindikavita #marathiquote #WritcoQuote #writcopoemchellenge