...

5 views

ज्योत
तुम्ही का गाता गुण?
पुन्हा पुन्हा इंग्रजांचे,
दिडशे वर्षे आम्हाला राबविले
ते आम्ही का आता विसरायचे ?
गुलामगिरीचे जगणे आता सोडून द्या.
स्वतंत्र आम्ही झालो हे जरा इंग्रजांना कळू द्या.
त्यांनी केलेले अत्याचार, अन्याय विसरलो नाही,
आपल्या स्वातंत्र्याची त्यांना जाणीव होऊ द्या.
जुन्या चाली, रिती, रूढी, परंपरा तुम्ही पुन्हा आळविता,
आपल्या स्वातंत्र्याच्या आड येणारा इंग्रज हा एकमेव शत्रू होता.
स्वातंत्र्यापूर्वीची पहाट गुलामगिरीची होती.
जेलमध्ये,नाही नाही ते भोगले....कारण,
मनात स्वातंत्र्याची ज्योत होती...
स्वातंत्र्याची ज्योत होती....

( कु. तन्वी सावंत )
२६ जानेवारी २०२३