...

2 views

आधी प्रेम हे स्वतःवर
कधी नव्हे तो आज दिवस उजाडला
भेटत नव्हते मी स्वत:ला आरशात ही पाहताना...
रोज तयार होत असे इतरांना आनंदी पाहायला
स्वानंद देखील असतो या जगी होते विसरायला

मग काय, स्वतःचे अस्तित्व लावले पणाला
माझे सगेसोयरे देखील लागले मजाक उडवायला
निमूटपणे सर्वांचे नखरे स्मितहास्यावरी घेतले
माझे मन मी असे रोज मारायला लागले

निरादर होऊ लागला या नी त्या क्षुल्लक कारणाला
असह्य जेव्हा झाले मी, लागले देवाला पुकारायला
भक्तीची शक्ती जेव्हा स्पर्शुन गेली या निरागस मनाला
समर्पण केले त्याच क्षणी मी ईश्वर चरणी स्वःताला

त्यानेही पदरात घेतले मज जसे आई घेते आपल्या बाळाला
अश्रु पुसूनी माझे शिकवले मला खंबीर नेतृत्व करायला
स्वतःच्या प्रेमात मी पडले तोच जगणेही प्रेमाचा वर्षाव केला
कधी नव्हे तो आज दिवस उजाडला





© fiery_fairy