...

0 views

स्त्री अत्याचार आणि आत्मकथा ...
जन्माआधी घेत होते बळी ,
पण आता होत नाही बळी ,
तीच जीवन उद्ध्वस्त करून ,
तिच्या जीवाची केली राख रांगोळी ..

अपेक्षा मारून जगावं,
शिकायची तळमळ होती,
परिस्थितीला सामोरे जात,
शिकली ती ..

नातेवाईक म्हणतात लोकच धन आहे,
करा दोनाचे चार हात असे त्याचे बोल ,
आई वडिलांना घेतल विश्वासात ,
संस्कार अन् संस्कृती जपते ती...

अखेर स्वप्न पूर्ण झाली ,
स्वतःच्या पायावर उभी राहिली,
आता मनसोक्त जगणार ,
असा मनात विचार आला..

रात्री बाहेर जात असताना,
मनाला वाटते भीती ,
पण जबाबदारी आणि कर्तव्यासाठी ,
काम करवाच लागत...

वाईट असते काहींची नजर,
विश्रांती घेत असताना
अत्याचार केला तिच्यावर ..

ओरडत होती वाचवा मला,
देवांनी दिली नाही साथ ,
शरीराची चिंधी करून टाकली,
आणि तिचा जीवही घेतला...

मुलगी शिकली प्रगती झाली,
पण ती सुरक्षित नाही झाली,
द्रौपदी लज्जा गोविंद ने वाचवली,
आता तूच महाकाली हो....

सरकारने दिली फाशीची शिक्षा ,
तरीही त्या नराधमांच् अंत नाही,
म्हणूनच शिवरायांचं आदर्श ,
अन् संस्कार आणि संस्कृती ची ,
शिकवण मुलांना लहानपणीच द्या...

काहींना वाटतं मुलाची बरोबर करतात मुली,
पण त्यांना हवं असत स्वातंत्र्य मनसोक्त जगण्याचं ,
म्हणून त्या लढतात पावलोपावली ..

स्त्री च्या राहणीमान वर तिच्या चारित्र्यावर
बोट दाखवल जात,
पण 4 वर्षाची लहान पोरं ती,
तिची काय होती चूक ..

शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा ,
हा संदेश जीवनात आना,
अत्याचार प्रसंगी लढण्याचं सामर्थ्य ठेवा ..

चेहऱ्यावर चा भाव , अन् मनातला घाव ,
कोणी समजणार नाही ,
तुझ स्वांतत्र्य जप तू ,
मनसोक्त जग तू...

राजनंदिनी लोमटे